'माझ्या नादी लागू नका, घरात घुसून मारेन!' कंगना एवढी का संतापली?

मुंबई: बॉलीवूडची क्वीन कंगना ही सध्या जास्तच संतापलेली दिसून येत आहे. तसंही कंगनाला बोलण्यासाठी कोणतंही कारण पुरतं. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाच्या वक्तव्यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना दिसते. आता तर तिनं तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी कंगना तुला एवढे रागवायला काय झाले असा सवाल केला आहे.यापूर्वी देखील कंगना बॉलीवूड माफियांवर चांगलीच संतापल्याचे दिसून आले आहे. कंगनाला बॉलीवूडमधील नेपोटिझमवर राग असल्याचे तिच्या प्रतिक्रियातून जाणवले आहे. 

तिनं त्यावर प्रतिक्रिया देताना कुणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख, आमिर खान, सलमान खान यांच्या चित्रपट आणि बॉलीवूडवर असलेल्या वर्चस्वाविषयी कंगनानं नेहमीच सडकून टीका केली आहे.आता पुन्हा एकदा कंगनानं तिच्यावर टीका करणाऱ्यांना धारदार शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. जी लोकं सांगून ऐकत नाहीत त्यांना शिक्षा करणं योग्यच असतं. असं कंगनानं म्हटलं आहे. कुणीही येतं बोलून जातं, ज्यांची बोलण्याची पात्रता नाही अशी लोकं मला बोलणार आणि मी ऐकून घेणार हे काही चालणार नाही. जर ऐकलं नाही तर मी घरात जाऊन अशा लोकांना मारल्याशिवाय राहणार नाही. असंही कंगना बोलली आहे.

कंगनानं तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन तिचा संताप व्यक्त केला आहे. बॉलीवूड माफियाविषयी तिनं व्यक्त केलेला राग हा दिसून येत आहे. तुम्ही वेळीच सुधरा नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरं जा. अशी जळजळीत प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते आहे.कंगनानं बॉलीवूड माफियांवर टीका करताना लिहिलं आहे की, जी लोकं मला सतत त्रास देत आहेत त्यांना मी काही सोडणार नाही. माझे तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद नाही. अशावेळी विनाकारण माझ्या नादी लागू नका. नाहीतर मी घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने