१० वर्ष गायब कुठे होतीस? या प्रश्नावर Genelia Deshmukh ने दिलेल्या उत्तराने सर्वांची बोलती बंद

मुंबई:   रितेश - जिनिलिया देशमुखच्या वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. वेड च्या माध्यमातून जिनिलिया देशमुखने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं.रितेशचा सुद्धा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा. जिनिलिया वेडच्या माध्यमातून तब्ब्ल १० वर्षांनी कॅमेरा समोर शुटिंग करत होती. १० वर्ष जिनिलिया गायब का होती असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नावर जिनिलियाने दिलेलं उत्तर प्रत्येकासाठी महत्वाचं आहे.जिनिलिया म्हणाली.. “सिनेमाला मिळालेला प्रतिसाद खरोखरच उत्साहवर्धक आणि खरोखरच आश्चर्यकारक आहे. मी याबद्दल खूप excited होते.कारण जेव्हा तुम्ही 10 वर्षांचा ब्रेक घेता आणि परत येता तेव्हा असे क्षण नेहमीच येतात जिथे तुम्हाला असे वाटते की, तुम्हाला पडद्यावर नीट दिसेल का किंवा स्क्रीनवर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकाल का.” ती म्हणते.35 वर्षीय जिनिलिया पुढे म्हणते, “जेव्हा माझ्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं तेव्हा ती खुप छान भावना असते . चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं यश तितकंच महत्वाचं आहे.पण आता हे यश मनात ठेवून पुढे जाण्याची वेळ आलीय. मला माहित आहे की हे यश तात्पुरते असणार आहे. पण तरीही वेडचा एकूण प्रवास खूप समाधान देणारा ठरला.”पुढे जिनिलियाने ब्रेक घेण्याचं कारण सांगितलं.. “मी ब्रेक घेतला कारण मला स्वतःसाठी ते गरजेचं होतं. मला कुटुंबाला महत्व द्यायचं होतं. कुटुंबाकडे लक्ष देऊन सिनेमात अभिनय करण्याचा आत्मविश्वास वाटत नव्हता.

हा एक मोठा निर्णय होता जो मी घेतला आणि मला त्याचा आनंद आहे. मी घेतलेल्या निर्णयाचा मी पूर्ण आदर करते. आज मला असे वाटते की खऱ्या आयुष्यात गृहिणी, पत्नी आणि आईची भूमिका साकारल्यानंतर या सर्व गोष्टींनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिलाय.माझ्याकडे एक प्रोडक्शन हाऊस, संगीत म्युसिक कंपनीची जबाबदारी आहे. मी अभिनयाव्यतिरिक्त काहीतरी करू शकले याची मला जाणीव झाली”अशाप्रकारे १० वर्षांनी जिनिलिया सिनेमात आली पण तिने सर्वांच्या मनावर राज्य केलं. ३० डिसेंबर २०२२ ला वेड सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने आजवर बॉक्स ऑफिसवर ७४ कोटींचा गल्ला जमवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने