"तुफानोसे तू ना डरता तेरा नाम अदानी ", म्हणत अदानींच्या सपोर्ट मध्ये उतरले रॅपर भिडू

मुंबई: गौतम अदानी हे भारतातील आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतात त्यांनी गेल्या पाच वर्षांत त्यांच्या समुहाने विमानतळं, सिमेंट, तांबे उद्योग, रिफायनरी, डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये भरपूर गुंतवणूक केली आहे.मात्र अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या अहवालामुळे भारत आणि आशियातील सर्वात मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे. असे आरोप करण्यात आले आहेत.ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतूनही ते बाहेर पडले आहेत.

या सर्व प्रकरणावर आता गौतम अदानी यांच्या समर्थनार्थ रॅप गाणे आले आहे. 'अदानी अँथम - तेरा नाम अदानी है' असे या गाण्याचे नाव आहे. गाण्यात गौतम अदानी यांचा प्रवास दाखवला आहे. गौतम अदानी देशभक्त आहेत असे या गाण्यातून सांगितले आहे. या गाण्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.Da Banotra Studio ने हे गाणे प्रदर्शित केले आहे. आत्ता पर्यंत तीन लाख लोकांनी हे गाणं पाहिले आहे. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने