'वाढत्या वयाबरोबर माणसं परिपक्व होतात पण अभिषेक...' अनुराग कश्यपची जहरी टीका

मुंबई: बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत आला आहे. आता त्यानं थेट प्रख्यात अभिनेता अभिषेक बच्चनवर टीका केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनुरागवर टीकाही होऊ लागली आहे. काही दिवसांपासून अनुराग त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे लाईमलाईट मध्ये आला आहे.अभिषेक सोबत मी युवा नावाचा चित्रपट केला होता. त्यात मी संवादलेखन केले होते. त्यामध्ये माझ्या भावानं देखील काम केले होते. आम्हाला अभिषेकच्या डबिंगवर देखील खूप काम करावे लागले होते. अभिषेक हा खूप कष्टाळु अभिनेता आहे. सुरुवातीला त्याचा स्वभाव खूप वेगळा होता. आता तो सांगितलेल्या गोष्टींना फारशा गांभीर्यानं घेत नाही. असं अनुरागचे म्हणणे आहे.अनुराग कश्यपनं म्हटले आहे की, वाढत्या वयाबरोबर आणि वेळेनुसार लोकं परिपक्व होत असतात. अभिषेकही सुरुवातीला होताना दिसला. मात्र त्यानंतर त्याच्यात काही बदल होताना दिसले. मी त्याच्यासोबत मनमर्जियामध्ये काम केले. युवामध्येही संवाद लेखनाच्यावेळी त्याच्याशी परिचय झाला होता. मात्र आताचा अभिषेक पूर्णपणे वेगळा असल्याचे दिसून येते.यावेळी अनुरागनं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही टिप्पणी केली आहे. मी जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत युद्धमध्ये काम केले होते. त्यावेळी मला त्यांच्यातील काही गोष्टी खटकल्या. अमिताभ त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला पॉझिटिव्हली घेतात. त्यांना कुणी काही सुचवले तर त्याचा विचार करतात. पण मला अभिषेक बद्दल जो अनुभव आला तो वेगळा होता. असेही अनुरागनं म्हटले आहे.सध्या अनुरागच्या प्यार विथ डीजेची मोठी चर्चा आहे. अनुराग या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुराग बॉलीवूडमधील वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करताना दिसतो आहे. त्यामुळे त्याच्यावर टीकाही होते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने