"बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना ठार केलं असतं", व्हिडीओमुळे खळबळ

तेलंगण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हमारा प्रसाद असं आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हमारा प्रसाद याने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केली होती.दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे. तर ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत हमारा प्रसाद याने हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक हातात घेतल्याचे दिसून येत आहे."आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ज्याप्रमाणे गोडसेने गांधींना ठार केलं त्याप्रमाणे मी बाबासाहेब आंबेडकर त्यांची हत्या केली असती," असं धक्कादायक विधान हमारा प्रसाद याने केलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने