लग्न अरुंधतीचं पण अनिरुद्धच्या डोक्याला ताप.. आता रागात थेट देशमुखांचं घर सोडणार

मुंबई: आई कुठे काय करते मालिकेत आता नवीन वळण आलंय. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अरुंधतीने हा निर्णय घरात सर्वांना सांगितला आहे. तेव्हापासून अरुंधती विरुद्ध अनिरुद्ध आणि कांचन गेले आहेत. अप्पा मात्र अरुंधतीच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आशुतोषला सुद्धा अरुंधतीची काळजी आहे. अरुंधतीच्या डोक्यावरची चिंता कमी होण्यासाठी आशुतोष प्रयत्न करतोय.अशातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय. यात अरुंधतीचं कन्यादान करण्याची इच्छा अप्पा बोलून दाखवतात. याशिवाय जेव्हा देशमुखांच्या घरी हि बोलणी होतात. तेव्हा अनिरुद्ध प्रचंड रागात असतो. अरुंधती जर लग्नाआधी इथे राहायला आली तर मी घरातून निघून जाईल. असं अनिरुद्ध सर्वांना सांगतो. पुढे अप्पा म्हणतात,"ज्यांना जे हवंय ते करावं. माझा निर्णय कोणासाठीही बदलणार नाही."अशाप्रकारे लग्न अरुंधतीचं पण अनिरुद्ध स्वतःच्या डोक्याला ताप करून घेतोय. पण अप्पा मात्र नेहमीप्रमाणे अरुंधतीच्या मागे ठामपणे उभे आहेत. अरुंधतीने लग्नाचा निर्णय घेतल्यापासून अनिरुद्ध आणि कांचन अरुंधती वर नाराज आहेत. आशुतोषला जाणीव असते कि या वयात लग्नाचा निर्णय घेतल्याने अरुंधतीला खूप विरोध सहन करावा लागणार आहे. यासाठी अरुंधतीला सपोर्ट करण्याची आशुतोषची मानसिक तयारी असते.छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकत आहे. आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांवर प्रेम मान्य केलं आहे.आता प्रेक्षकांना त्याच्या लग्नाची प्रतिक्षा आहे. सध्या मालिकेत एकीकडे देशमुखांच्या कुटुंबात असलेला विरोध तर दुसरीकडे अरुंधती - आशुतोषचा लव्ह ट्रँगल असे ट्रॅक पाहायला मिळत आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने