म्हणे भारत पाकिस्तानात खेळायला घाबरतो.... मियाँदाद बरळले!

पाकिस्तान: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 च्या यजमान पदावरून उठलेलं वादंग अजून शमलं नाही. पीसीबी प्रमुख नजम सेठी आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांची एसीसीस बैठकीत खडाजंगी झाली होती. भारताने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला होता.आता या वादात पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट आयसीसीला भारताला काढून टाकण्याच्या सल्ला दिला आहे. मियाँदाद म्हणाले की, 'मी पहिल्यांदाच सांगितले होते. नाही येत तर नाही येत. आपल्याला काही फरक पडत नाही. आपलं क्रिकेट सुरू आहे. हे आयसीसीचे काम आहे. जर या गोष्टी आयसीसी नियंत्रित करू शकत नसेल तर त्यांचा काही उपयोगच नाहीये.'मियाँदाद पुढे म्हणाला की, 'आयसीसीने प्रत्येक देशासाठी एकच नियम लावला पाहिजे. जर असे संघ आले नाहीत तर ते कितीही शक्तीशाली असू देत तुम्ही त्यांना हटवले पाहिजे.'पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पुढे अजब दावा केला. मियाँदाद म्हणाले की, 'भारताने येऊन खेळले पाहिजे, तुम्ही खेळत का नाही. ते पळून जात आहेत. ते अडचणीत सापडणार असे वाटले की ते पळून जातात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने