“माझ्याविरोधात लढा, कसे निवडून येता ते बघतो,” आदित्य ठाकरेंचे थेट एकनाथ शिंदेंना आव्हान, म्हणाले “एकही मत…”

मुंबई: शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख घटनाबाह्य मुख्यमंत्री असा केला जातो. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. मी माझ्या मतदारसंघातून राजीमाना देतो. माझ्याविरोधात निवडणूक लढवा. तुम्ही कसे निवडून येतात ते मी बघतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते एका जाहीर सभेत बोलत होते.मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. तुम्ही वरळीतून कसे निवडून येता ते मी बघतो. जी यंत्रणा लावायची आहे ती लावा. जी ताकद लावायची आहे ती लावा. जेवढे खोके वाटायचे आहेत तेवढे वाटा. मात्र एकही मत विकले जाणार नाही. मी त्यांना पाडणारच, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने