“अथिया घरात कोणालाच…” , लग्नानंतर पत्नीबद्दल केएल राहुलने केला खुलासा

मुंबई:  क्रिकेटर केएल राहुलने आता लग्नानंतर अथिया शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की अथिया शेट्टीला संपूर्ण कुटुंब घाबरते. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे गेल्या महिन्यात सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर लग्न झाले.यावेळी सुनील शेट्टी यांनी फोटोग्राफरचे आभारही मानले होते. लग्नानंतरच्या वेडिंग रिसेप्शनची माहिती देताना ते म्हणाले की, ते आयपीएलनंतर होईल.नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत के.एल.राहुलने अथियाबद्दल वक्तव्य केलं आहे. अथिया राहुलला विचारत आहे की ती कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला घाबरते. यावर केएल राहुल म्हणतो, 'तू तुझ्या आईच्या जवळ आहेस आणि संपूर्ण कुटुंब तुला घाबरते आणि तू कोणाला घाबरत नाहीस.'दोघांनाही विचारण्यात आले की कोण चांगला स्वयंपाक करतो ? यावर अथिया म्हणाली की लॉकडाऊनमध्ये तिने यावर काम केले होते पण केएल राहुल चांगला स्वयंपाक करतो.जेव्हा केएल राहुलला विचारण्यात आले की सर्वात मजेदार कोण आहे. यावर केएल राहुल म्हणतो की तो स्वतः. त्याचवेळी अथिया यावर म्हणते, 'ती मी आहे.' जेव्हा त्यांना विचारण्यात आले सगळ्यात पाहिलंत सॉरी कोण बोलतं. यावर अथियाने उत्तर दिले की, ती नेहमी सॉरी बोलते.

मग केएल राहुल म्हणतो कारण तो नेहमीच चुकीचा असतो. दोघांमध्ये जिद्दी कोण असा प्रश्न दोघांना विचारला असता दोघांनी एकमेकांकडे बोटे दाखवली.अथिया शेट्टी आणि केएल राहुलने लग्नानंतर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि अनन्या पांडे सारख्या लोकांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने