महिला प्रीमियर लीगची तारीख ठरली! गुजरात नाही तर मुंबईत होणार पहिला हंगाम

 मुंबई : बीसीसीआयच्या महिला प्रीमियर लीगच्या  पहिल्या हंगामाचा श्रीगणेशा कधी करायचा याची तारीख ठरली आहे. बहुप्रतिक्षित  चा पहिला हंगाम हा 4 मार्च ते 26 मार्च यादरम्यान होणार आहे.लीगचा पहिला हंगाम आयोजित करण्याचा मान हा मुंबईला मिळणार आहे. हंगामातील पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रेंचायजींच्या संघात होण्याची शक्यता आहे.WPL मध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सने सारख्या आयपीएलमधील फ्रेंचायजींनी संघ खरेदी केले आहेत. त्याचबरोबर कॅपरी ग्लोबल होल्डिंग्ज (लखनौ) आणि अदानी स्पोर्ट्सलाईनने देखील संघ खरेदी केले आहे.WPL लीगमध्ये जवळपास 1500 खेळाडूंनी लिलावासाठी नोदंणी केली आहे. या बाबतची शेवटची यादी ही या आठवड्याच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे.लिलावात प्रत्येक फ्रेंजायती खेळाडूंवर 12 कोटी रूपये खर्च करू शकतात. संघ किमान 15 तर जास्तीजास्त 18 खेळाडू घेऊ शकतात. या लीगमध्ये 22 सामने खेळले जाणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने