कांताराच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! रिषभ शेट्टीचा खुलासा, आता...

मुंबई :ज्या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांना वेड लावलं त्या कांतारा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. तीनशे कोटींहून अधिक कमाई करत कांतारानं आपली वेगळी ओळख भारतीय चित्रपट विश्वामध्ये केली. आगळ्या वेगळ्या विषयाची प्रभावी मांडणी हे कांताराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आता एक रिषभनं केलेली घोषणा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.होंबाळे फिल्म्सच्या 'कांतारा'ने आपल्या उत्कृष्ट कथानक आणि सीन्सने दर्शकांना जिंकून घेतले. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींची कमाई करत आपलं वेगळेपण या चित्रपटानं सिद्ध केलं. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपटाचे कौतुकही केले. इतकेच नाही तर 'कांतारा'हा 2022 चा धमाकेदार ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून उदयास येऊन वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला.प्रेक्षक अजूनही 'कांतारा'बद्दल बोलत असताना, त्याच्या कौतूकात असताना दुसरी एक बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.तुम्ही पाहिलेला पार्ट 2 आहे, पार्ट 1 पुढील वर्षी येईल. 'कांतारा' चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली. कारण कांताराचा इतिहास अधिक खोल आहे. तसेच, या सिनेमाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत. 'कांतारा'च्या प्रीक्वेलची निर्मिती होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदुर आणि चालुवे गौडाद्वारा होणार असून, या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने