वरुण गांधी यांना दोनदा मंत्रिपदाची होती ऑफर, पण...; भाजप खासदाराचा मोठा खुलासा

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातल्या पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. ते आपल्या पक्षावर नाराज असल्याचा अंदाज लावला जात आहे.मोदी सरकराच्या दोन्ही कार्यकाळांमध्ये वरुण गांधींना एकदाही मंत्रिपद मिळालेलं नाही. आता केंद्रात मंत्रिपदावरुन वरुण गांधी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांना दोन वेळा मंत्री होण्यासाठी विचारण्यात आलेलं होतं, परंतु ती ऑफर त्यांनी फेटाळून लावली होती.


एका कार्यक्रमादरम्यान बोलतांना गांधी म्हणाले की, मी दोनदा मंत्रिपदाची ऑफर फेटाळली आहे. याविषयी जास्त लोकांना माहिती नाही. जर तुम्ही कुणाशी सन्मानाने बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यात तथ्य असेल तर ते ऐकून घेणारे लोक मोठ्या मनाचे असतात.असं गोंधळून टाकणारं विधान त्यांनी केल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही शिक्षण मंत्री असता तर कोणती कामं केली असती, यावर उत्तर देतांना वरुण गांधी म्हणाले की, सगळ्यात पहिल्यांदा मी अभ्यासक्रम बदलला असता आणि शिक्षकांची संख्या वाढवली असती. त्यानंतर कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले असते, असं गांधी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने