'सनातन'चा दाखला देत इस्लाम, ख्रिश्चनांबाबत रामदेव बाबांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, धर्माची तत्त्वं..

मुंबई: टीव्ही मालिका  आणि चित्रपटांमधील अश्लील दृश्य देशातील तरुणांवर परिणाम करत आहेत, असं स्पष्ट मत योगगुरू बाबा रामदेव  यांनी व्यक्त केलं. ते मिरामार बीचवर आयोजित केलेल्या योग शिबिरात बोलत होते.आजची तरुण पिढी अश्लीलतेमुळं प्रभावित होत आहे. आज सर्वत्र अश्लील चित्रपट दाखवले जात आहेत. चित्रपट आणि मालिकांमध्ये अश्लीलता आहे. तरुण पिढी अशा आशयाकडं आकर्षित होत आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले.बाबा रामदेव पुढं म्हणाले, 'कोणतंही औषध न घेता लोकांना नैसर्गिकरित्या निरोगी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणं हा माझा उद्देश आहे. देशात अश्‍लील चित्रपटांची निर्मिती होत आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये इतकी अश्लीलता आहे, ज्यामुळं तरुण पिढी भरकटत आहे.'सनातन  सर्व धर्मांना जोडत असल्यामुळं मी सनातनचं पालन करण्याचं आवाहन करत असतो. मी सनातन हा शब्द मुद्दाम वापरलाय. कारण, यात आपल्या सर्व सनातन विचारधारा आणि मूल्यांचा समावेश आहे. यामध्ये हिंदू, जैन, बौद्ध यांसह सर्व धर्मांचा समावेश आहे. सनातनमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माची मूलभूत तत्त्वं देखील आहेत, असंही बाबा रामदेव म्हणाले. मिरामार बीचवर आयोजित केलेल्या तीन दिवसीय योग शिबिरात 'सनातन संगीत महोत्सवा'सह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक कैलाश खेर सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने