नोटीस म्हणजे अविश्वास ठराव नाही, नरहरी झिरवळ पहिल्यांदाच 'त्या' विषयावर बोलले

मुंबई: शिवसेनेत फूट उभी फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं. हे प्रकरण देशभर तापलं, शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली.मात्र शिंदे गटाने खेळी खेळत तत्कालीन पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत असलेले नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला.मात्र हा वाद कोर्टात दाखल करण्यात आला. तो पर्यंत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.या सर्व मोठ्या घडामोडींनंतर आज विधानसभा उपअध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की,"त्यावेळी मला फक्त एक नोटीस पाठवली होती, नोटीस पाठवणे म्हणजे अविश्वास ठराव होत नाही.अविश्वासाचा ठराव होता तर माझ्या उपस्थित विधानसभा अध्यक्षाना शपथ कशी दिली. जर माझ्यावर अविश्वास होता तर मी अध्यक्षांना शपथ कशी देऊ शकतो हा एक संशोधनाचा भाग आहे". अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने