आदित्य ठाकरेंनी त्यांच्या खास शैलित CM शिंदेंना दिल्या शुभेच्छा

मुंबई: काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. बंडानंतर एकनाथ शिंदे हे नाव सर्वदूर परिचयाचे झाले. आज मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ता अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बंड केलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे कुटूंब शुभेच्छा देणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. दरम्यान, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलित शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. बिडकीन येथील सभेला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विचारले.काय म्हणाले ठाकरे?

माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असल्याचे आदित्य ठाकरे यांना सागंतिले. त्यावर बोलताना, “आज काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की, आम्ही कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसले असतील, पाठीत वार केले असतील तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्याच शुभेच्छा सर्वांसोबत असतात.” अस ठाकरे म्हणाले.आदित्य ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान दिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने