१३ वर्षांपूर्वी सांगितलेलं की तुम्ही मुख्यमंत्री.. मंगेश देसाईंची खास आठवण

मुंबई: आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस. सत्तासंघर्षांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला वाढदिवस होतोय. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची तमाम जनता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतेय. अशातच धर्मवीर सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाई यांनी खास आठवण शेयर केलीय. मंगेश देसाई यांनी १३ वर्षांपूर्वी साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एका अर्थी मंगेश देसाई यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण झालीय. मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर सविस्तरपणे हि आठवण शेयर केलीय.


मंगेश देसाई म्हणतात, "साहेब तुमच्या विषयी काय लिहू ??!!! किती लिहू !!!शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत आणि त्या शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाहीत .पण आज एक प्रसंग आठवतो, 2009 साली तुमच्या वाढदिवसाला मी शुभेच्छाचा फोन केला होता आणि एक भावना व्यक्त केली होती.मी म्हणालो होतो "तुम्ही मुख्यमंत्री व्हावं "तुम्ही हसला होतात 'आणि हे कसं शक्य आहे मंगेश ?असं म्हणाला होतात .पण माझ्या सारख्या अनेक लोकांनी हीच भावना देवा जवळ मनापासून बोलून दाखवली असणार आणि देवाने ती साठवून ठेवली असणार .तुम्ही मुख्यमंत्री झालात ,जनतेचे आवडते झाला आहात.

मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा वाढदिवस .या पुढील प्रयेक वाढदिवस तुमच्या आयुष्यात नवनवीन शक्ती देणारा ठरो हीच देवाकडे प्रार्थना .तब्येतीची काळजी घ्या .कामा बरोबर आराम पण करा आणि शक्तिशाली व्हा" अशी खास आठवण मंगेश देसाई यांनी शेयर केलीय.धर्मवीर च्या तुफान यशानंतर आता मंगेश देसाई धर्मवीर २ सिनेमा आणत आहेत. मंगेश देसाई यांनी धर्मवीरच्या वर्षपूर्तीनिमित्त हि घोषणा केली होती. "धर्मवीरांच्या गोष्टी खूप बाकी आहेत, अनेक भाग करून ही त्यांच्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत, त्यामुळे धर्मवीरचा दुसरा भाग २०२४ ला घेऊन येत आहोत" अशी अधिकृत घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी मुख्य कलाकार प्रसाद ओक याच्यासमवेत केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने