"सीमावर्ती कन्नडिगांसाठी लवकरच शंभर कोटी देणार"

बंगळूर- मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावर्ती भागातील कन्नडिगांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधांसह कन्नड भाषेच्या विकासाला मदत करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत शंभर कोटी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे गुरुवारी कुमारकृपा रोडवरील गांधी स्मारक भवन येथे आयोजित ‘गडीनाड चेतना’पुरस्कार सोहळ्यात आणि राज्य पुरस्कार विजेत्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना ते बोलत होते.बोम्मई म्हणाले, ‘‘राज्याच्या सीमावर्ती भागातील कन्नडिगांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. मुख्यमंत्री या नात्याने मी आपल्या सीमेवरील लोकांना सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. सीमावर्तीयांच्या विकासासाठी आम्ही सीमा विकास प्राधिकरणाला यापूर्वीच २५ कोटी रुपये दिले आहेत. आता मी यावर्षी ३१ मार्चपर्यंत शंभर कोटी रुपये देईन.प्राधिकरणाने आवश्यक कृती आराखडा तयार करावा.’’केवळ सीमावासीयांचे प्रश्न सोडवायचे एवढेच नाही, तर सीमेपलीकडचे कन्नडीगही आपलेच आहेत. त्यांना हवे ते विशेषाधिकार देण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे तयार आहोत. कन्नड जमीन, पाणी आणि भूजल प्रश्नासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून कन्नड आणि कन्नडगांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुरस्कार प्रदान

सीमावर्ती भागातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. चन्नबसव पट्टद्देवरू, डॉ. जयदेवीताई लिगाडे आणि डॉ. कय्यार किन्ननराय यांच्या नावाने स्थापन केलेला ‘गडीनाडू चेतना’ पुरस्कार सीमावर्ती एम. एस. सिंधूर यांना प्रदान केला.यावेळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर कंबार, कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेखर, माजी मंत्री राणी सतीश, लीलादेवी आर. प्रसाद आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने