'भारतीयांना कॉपी करण्यात आयुष्य गेलं' पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शाहला तिच्याच लोकांनी केलं ट्रोल

मुंबई: भारत आणि पाकिस्तान याचे सबंध हे काही कोणापासून लपलेल नाही. पाकिस्तानात काहीही झालं की त्यांची भारतीयांशी होतेच. तसं काहीस आताही झालं आहे. नुकतचं पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री उस्ना शाहने लग्नगाठ बांधली आहे.तिने लग्नाचा व्हिडिओ शेअर करताच तिचा लाल रंगाचा लेहेंगा आणि ब्राइडल लूक हा विषेश चर्चेचा विषय बनला. तिच्याच देशातल्या लोकांना तिचा राग आला आणि त्यांनी तिला ट्रोल केलं. लोक म्हणाले की ती तिची संस्कृती विसरली आहे आणि ती भारतीय वधूप्रमाणं श्रृंगार केलायं.

पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शाहने गोल्फर हमजा अमीनशी लग्न केले. सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. उस्नाने तिच्या खास दिवशी लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. त्याच्या लग्नात त्याने खूप एन्जॉय केले आणि जोरदार नाचले. मात्र, काही लोक तिच्या लग्नातील पोशाख आणि नृत्यावर खूश नाहीत.हे पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, हा 'पाकिस्तानींची स्वतःची संस्कृती आणि धर्म आहे. भारतीय संस्कृती पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न थांबवा. आम्ही मुस्लिम आहोत आणि आमचा धर्म आम्हाला असे कपडे घालण्याची परवानगी देत ​​नाही. नकारात्मकता पसरवणे थांबवा.आणखी एका युजरने लिहिले, 'पाकिस्तानी नववधूनं अशा भारतीय स्टाईलमध्ये का कपडे घालत आहेत? ही आमची संस्कृती नाही!!" अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओला आल्या आणि तिला खुप ट्रोलही करण्यात आलं.उस्नानेही तिच्या लग्नाच्या पोशाखावर आणि नृत्यावर आक्षेप घेणाऱ्याना तिच्या इंस्टाग्राम स्टोरी टाकत चांगलच सुनावलं. तिने लिहिलं की, 'ज्यांना माझ्या ड्रेसची अडचण होत आहे त्यांच्यासाठी, तुम्हाला माझ्या लग्नासाठी आमंत्रित केले गेलं नाही, किंवा तुम्ही माझ्या लाल लेहेंग्यासाठी पैसेही दिलेले नाहीत. माझे दागिने, माझा ड्रेल पूर्णपणे पाकिस्तानी आहे. लग्नात दाखल झालेल्या अनिमंत्रित छायाचित्रकारांना सलाम.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने