'बिचारा आमिर खान', कंगनाने व्हायरल व्हिडीओवर केलं ट्विट

मुंबई: अभिनेत्री कंगनाने आमिर खानबद्दल ट्विट केले आहे, ज्यामध्ये ती त्याला बिचारा म्हणत आहे. खरं तर, अलीकडेच आमिर खानला एक प्रश्न विचारण्यात आला होता की लेखिका शोभा डे यांच्या भूमिकेसाठी सर्वात परफेक्ट अभिनेत्री कोण आहे. प्रत्युत्तरात आमिर खानने बॉलिवूड सेलिब्रिटी दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांचे नाव घेतले"."या अभिनेत्री ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारू शकते, असे आमिरने सांगितले, मात्र शोभा डे यांनी आमिर खानला मध्येच थांबवले आणि तुम्ही एका अभिनेत्रीचे नाव विसरत आहात असे सांगितले. ती म्हणजे कंगना. शोभा डे यांनी कंगनाचे नाव घेतल्यांनंतर ,आमिर कंगनाचे कौतुक करत म्हणतो , 'होय, कंगनाही ती चांगली भूमिका करू शकते".
कंगना आमिर खानला म्हणाली 'बिचारा', आता अभिनेत्री कंगनाने या व्हिडिओवर ट्विट केले आहे. कंगनाने लिहिले आहे- 'बिचारा आमिर खान... हा हा, त्याने असे दाखवण्याचा प्रयत्न केला की जणू त्याला माहित नाही की तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी मी एकमेव अभिनेत्री आहे. त्याने उल्लेख केलेल्यांपैकी एकही नाही. धन्यवाद @DeShobhaa जी मला तुमची भूमिका करायला आवडेल'कंगना म्हणाली, 'शोभा जी आणि माझे राजकीय विचार जुळत नसतील, पण माझ्या कामाची, मेहनतीची आणि समर्पणाची प्रशंसा करण्यात त्या कमी पडत नाहीत. हे एखाद्याची मूल्ये आणि अखंडता दर्शवते. मॅडम तुमच्या नवीन पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. माफ करा, माझ्याकडे आधीच 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि एक पद्मश्री पुरस्कार आहे. मला किती पुरस्कार मिळाले हे आठवत नसले तरी माझ्या चाहत्याने मला आठवण करून दिली".

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने