जगभरातल्या बँकांच्या सोनेखरेदीवर उड्या; 55 वर्षांनंतर सर्वात जास्त खरेदी

नवी दिल्लीः जगभरातल्या सेंट्रल बँकांनी २०२२ या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. मागच्या वर्षामध्ये सेंट्रल बँकांनी १ हजार १३६ टन सोने खरेदी केले. त्याची व्हॅल्यू ७० अरब डॉलर इतकी आहे.WGC अर्थात वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने याबाबत माहिती दिली आहे. डब्ल्यूडीसीने सांगितलं की, १९६७ नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सेंट्रल बँकांनी कधीच सोनं खरेदी केलेलं नव्हतं. ११३६ टन सोन्याची खरेदी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सोन्याशी संबंधित बँकांचं सध्याचं धोरण १९९० आणि २००० या दशकापेक्षा अगदी वेगळं आहे. त्यावेळी पश्चिम युरोपच्या सेंट्रल बँकांनी आपल्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या सोन्यापैकी हजारो टनांची विक्री केली. २००८-२००९ च्या आर्थिक मंदीनंतर युरोपीनय बँकांनी सोनं विकणं बंद केलं.रशिया, तुर्की आणि भारतासह अनेक विकसनशील देशांनी सोनं खरेदी सुरु केली. सेंट्रल बँकांच्या सोनं खरेदीमागे कारणंही तसंच आहे. असं समजलं जातं की, करन्सी आणि बाँडपेक्षा सोनं हे अडचणीच्या वेळीही कामी येतं. कारण त्याचं मूल्य अबाधित असतं. म्हणूनच सोनं खरेदीवर उड्या पडल्या आहेत.वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे अॅनालिस्ट कृष्णन गोपाल यांनी संगितलं की, सेंट्रल बँकांमध्ये सध्या सोनं खरेदीचा ट्रेंड दिसून येत आहे. चीन, इजिप्त, आणि कतारच्या सेंट्रल बँकांनी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कदाचितच चालू वर्षात खरेदी होईल, असं संगितलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने