भारतीय संघाला शेवटच्या मिनिटाला सोडावे लागले हॉटेल; दिल्लीत नेमकं काय झालं?

मुंबई:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला असून त्यांचा सराव देखील सुरू आहे. मात्र भारतीय संघाला ऐनवेळी आपले हॉटेल सोडून दुसरे हॉटेल शोधावे लागले.भारतीय संघाने दिल्ली येथील आपले हॉटेल शेवटच्या मिनिटाला बदलले. कारण दिल्लीत जी 20 परिषद आणि लग्नाच्या हंगामामुळे पंचतारांकित हॉटेलमधील बऱ्याच रूम बुक आहेत. भारतीय संघ दिल्लीत सहसा ताज पॅलेस किंवा आयटीसी मयुरा हॉटेलध्ये थांबते. मात्र यावेळी त्यांनी ऐनवेळी हॉटेल बदलून नोएडा येथील लीला हॉटेलमध्ये थांबावे लागले. बीसीसीआय अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.भारताची माजी कर्णधार विराट कोहली मात्र संघासोबत रहात नसून त्याने दिल्लीतील आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो गुरूग्रामधील आपल्या घरात दोन चार दिवस राहणार आहे. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाची परवानगी देखील घेतली आहे. भारतीय संघ खूप कालावधीनंतर दिल्लीत कसोटी सामना खेळत आहे.विराट कोहलीने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी संघासोबत न राहता घरी थांबण्याचा निर्णय घेतला. तो गेल्या दोन दिवसांपासून घरी राहतोय. विराट कोहली अनेक दिवसांनंतर दिल्लीत लाँग ड्राईव्ह एन्जॉय करतोय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने