ICCने स्पष्ट सांगितले! भारत-ऑस्ट्रेलियात रंगणार WTC फायनल थरार?

मुंबई:   भारताने कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला. यासह 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाची या विजयासह टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याची शक्यताही दाट वाढली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कोणाच्यात खेळल्या जाणार हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट सांगितले आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी कोणत्या दोन संघांमध्ये खेळण्याची शक्यता दाट आहे याची माहिती दिली. WTC ची फायनल जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या फक्त तीन संघांना फायनलमध्ये जाण्याची संधी आहे, परंतु ICC ने सांगितले आहे की दोन संघ आहेत ज्यांची शक्यता 89% आहे.दिल्लीत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यामुळे डब्ल्यूटीसीच्या टेबलमध्ये बरेच फेरबदल झाले. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता फक्त भारत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेलाच अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.ICC नुसार WTC 2023ची फायनल भारत आणि श्रीलंका यांच्यात होण्याची शक्यता 2.8 टक्के आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची केवळ 8.3 टक्के शक्यता दिली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसी फायनलची शक्यता 88.9 टक्के आहे.ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धचे उरलेले दोन सामने हरले आणि लंकेने न्यूझीलंडविरुद्धचे दोन कसोटी सामने जिंकेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. त्याच वेळी भारताने उर्वरित दोन सामने गमावल्यानंतर आणि श्रीलंकेचा संघ दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ बाहेर जाऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने