व्ह्यूजच्या बाबतीत ‘पठाण’ला मागे टाकणाऱ्या कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘शहजादा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. गेले अनेक दिवस त्या चित्रपटाचं विविध शहरांमध्ये जाऊन जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अखेर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी त्याने किती गल्ला जमवला ही आकडेवारी समोर आली आहे.कार्तिक आर्यानचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक होते. या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाने शाहरुखच्या ‘पठाण’लाही मागे टाकलं होतं. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात दमदार कामगिरी करणार असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र पहिल्या दिवशी तसेच चित्र दिसलं नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने विशेष कामगिरी केलेली नाही.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एका तिकिटावर एक तिकीट मोफत ही ऑफर आणली होती. मात्र तरीसुद्धा या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणावी तितकी चांगली कामगिरी केलेली नाही. या चित्रपटाने देशभरातून पहिल्या दिवशी फक्त ६ कोटींची कमाई केली आहे. तर त्यातील २.९२ कोटी या चित्रपटाने मोठ्या चित्रपटगृहांच्या चेन्समधून कमावले आहेत. हा आकडा कार्तिकच्या आधीच्या ‘भुलभूलैया २’ चित्रपटाच्या जवळपास निम्मा आहे. परंतु आजच्या महाशिवरात्रीच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाला होऊन दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई ६ कोटींपेक्षा अधिक होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.प्रदर्शनाच्या आधी कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाची खूप चर्चा होती. युट्यूब व्हूजच्या बाबतीत या चित्रपटाच्या ट्रेलरने ‘पठाण’च्या ट्रेलरने ‘पठाण’लाही मागे टाकलं होतं. त्यामुळे हा चित्रपटगृहात चांगली कामगिरी करेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र तसं झालेलं नाही. त्याचप्रमाणे हा चित्रपट पाहून अनेकांची निराशा झाली आहे. या चित्रपटाबद्दल आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने