गुंतवणूकदारांना मोठा इशारा! देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांची अवस्था बिकट, गुंतवणूक...

मुंबई: देशातील दहा सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन गेल्या आठवड्यात 49,231.44 कोटी रुपयांनी घसरले, त्यात हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) कंपनीला सर्वात जास्त तोटा झाला.गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 159.18 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी घसरला.एचयूएल (HUL) व्यतिरिक्त, भारती एअरटेल, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दहा कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, टीसीएस, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसचे बाजार भांडवल वाढले आहे.

या कंपन्यांचे मोठे नुकसान :

चार कंपन्यांचे बाजार मूल्य एकत्रितपणे 35,840.35 कोटी रुपयांनी वाढले, परंतु इतर 6 कंपन्यांच्या एकूण तोट्यापेक्षा ते कमी होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 15,918.48 कोटी रुपयांनी घसरून 6,05,759.87 कोटी रुपयांवर आले.भारती एअरटेलचे मूल्यांकन 12,540.63 कोटी रुपयांनी घसरून 4,29,474.82 कोटी रुपये आणि ITCचे मूल्यांकन 11,420.89 कोटी रुपयांनी घसरून 4,60,932.38 कोटी रुपये झाले. ICICI बँक 6,863.37 कोटी रुपयांनी घसरून 5,95,885.63 कोटींवर बंद झाली.एचडीएफसी बँकेचे भांडवल 1,255 कोटी रुपयांनी घसरून 9,23,933.45 कोटी रुपये झाले आणि एचडीएफसीचे भांडवल 1,233.07 कोटी रुपयांनी घसरून 4,91,080 कोटी रुपये झाले.'या' कंपन्यांमध्ये नफा :

नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये टीसीएसचे मूल्यांकन 19,612.52 कोटी रुपयांनी वाढून 12,93,639.32 कोटी रुपयांवर पोहोचले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार भांडवल 7,585.92 कोटी रुपयांनी वाढून 4,93,486.41 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.देशातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून रिलायन्सने आपले स्थान कायम ठेवले. त्याचे मूल्यांकन 4,938.8 कोटी रुपयांनी वाढून 15,80,653.94 कोटी रुपये झाले. इन्फोसिसची एकूण संपत्ती 3,703.11 कोटी रुपयांनी वाढून 6,76,638.36 कोटी रुपयांवर पोहोचली.सर्वात मौल्यवान भारतीय कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी, आयटीसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने