कोणते Cooking Oil हृदयासाठी चांगले आहे? हे वाचून तुम्ही Oily पदार्थांना कायमचं बाय बाय म्हणाल

मुंबई: तेल म्हणजे एक प्रकारची चरबीच (Fat) आहे. शरीराची क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, पचन सुलभ करण्यासाठी आणि जीवनसत्व शोषणासाठी ते आवश्यक देखील आहे. म्हणूनच आपण तेल वापरतो “आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स संतुलित ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात 10 ते 15 टक्के फॅटची आवश्यकता असते. खरं तर हे संतुलन आपण कायम राखायला पाहिजे. असे फोर्टिस गुडगाव येथील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. उदगथ धीर म्हणतात.भारतात इतर देशांच्या तुलनेत हृदयविकाराच्या आजारांची सुरुवात एक दशकाआधीच झालीय. तेव्हा आपण स्वयंपाकाच्या पद्धतीच हवे ते बदल करायलाच पाहिजे असेही डॉ. म्हणालेत. पूर्वी हृदयविकाराच्या समस्या फक्त वयोवृद्धात जास्त दिसून येत होत्या. मात्र आता हे प्रमाण तरुणांमध्येही वाढत चालल्याचे दिसून येते. हृदयविकाराच्या गंभीर शस्त्रक्रिया होणाऱ्यांच्या यादीत तरुणांची संख्या मोठी आहे. असेही डॉक्टर म्हणालेत.सर्वात आरोग्यदायी तेल कोणते?

सर्वात आरोग्यदायी तेले ते आहे ज्यात बहुतेक पॉली आणि मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि जे कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तेव्हा सर्व वनस्पतींपासून काढलेले तेल हे प्राण्यांच्या चरबीपासून तयार झालेल्या तेलाच्या तुलनेत आरोग्यदायी असतात. काजू आणि बियाण्यांपासून काढलेले तेलही चांगले असते.


सर्वात वाईट तेल कुठले?

सर्वात वाईट तेले ते आहे जे हायड्रोजनेटेड किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आहेत. अर्थात रुमटेंप्रेचरमध्ये घन असणारे जसे की तूप, लोणी, अॅनिमल फॅट, फॅटी डेअरी प्रोडक्ट्स, पाम. एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की जर तुमच्याकडे भरपूर खोबरेल तेल असेल तर तुमचे LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकते. म्हणून, जोपर्यंत तुम्ही विशिष्ट आहाराच्या सवयींसाठी व्हर्जिन नारळ तेलाचा वापर कमी प्रमाणात करत नाही तोपर्यंत तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये येणार नाही. किंवा तुमच्या आहारतज्ञांकडून ठराविक वेळेस, शिफारस केलेल्या मर्यादेत नेमके किती प्रमाणात तेल वापरावे हे तपासल्याशिवाय, त्याचा अजिबात वापर करु नका. त्यापेक्षा मोहरीचे तेल चांगले आहे आणि अगदी अर्धा चमचा देशी तूप देखील काम करते,” असे डॉ धीर म्हणतात.डॉ धीर यांच्या म्हणण्यानुसार, अन्नामध्ये तेलाचे योग्य प्रमाण असायला हवे. आणि डिप फ्राइंग टाळा कारण तेल कितीही चांगले असले तरी ते जास्त उष्णतेवर त्याचे सर्व चांगले गुणधर्म गमावून बसते. आणि म्हणूनच एकदा तळणासाठी वापरलेले तेल परत वापरू नये. हाय टेम्प्रेचरमध्ये, आपल्या तेलातील काही चरबी सहजपणे ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. डिप फ्राइंगवेळी हाय टेम्प्रेचरमुळे स्वयंपाकातून मुक्त फॅटी ऍसिडस् आणि रॅडिकल्स बाहेर पडतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव, जळजळ निर्माण होते. पुन्हा वापरलेले तेल देखील कार्सिनोजेनिक आहे,” डॉ धीर यांनी स्पष्ट सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने