कोरोनाबाबत अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मोठा दावा; जगाच्या नजरा पुन्हा चीनकडे

अमेरिका: दोन वर्षापूर्वी कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस घरले होते. हा विषाणू चीनमधीव वुहान प्रयोगशाळेतून पसरल्याचा संशय अनेक देशांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.त्यानंतर आता अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. यानंतर पुन्हा एकदा सर्व जगाच्या नजरा चीनकडे वळाल्या आहेत.कोरोना विषाणूची उत्पत्ती इतर कुठूनही झाली नसून चीनमधील वुहान प्रयोगशाळेतून झाली असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.जगभरातील तपास यंत्रणांनी कोरोनाच्या उत्पत्तीसाठी चीनला जबाबदार धरले आहे. हा विषाणू चीनच्या वुहानच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचा दावा केला जात आहे.मात्र, चीनकडून सातत्याने या आरोपांचे खंडन केले जात आहे. हा विषाणू वुहान प्रयोगशाळेतील नसून बाहेरून आल्याचे चीन संपूर्ण जगाला सांगत आहे. परंतु, हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतूनच बाहेर पडल्याचे पुरावे अनेक तपास यंत्रणांनी सादर केले आहेत.वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये हा विषाणुची उत्पत्ती बहुधा चीनमधील प्रयोगशाळेतून झाल्याचे नमुद केले आहे. ऊर्जा विभागाचा हा अहवाल नवीन गुप्तचर माहितीनंतर तयार करण्यात आला आहे. हा रिपोर्ट तयार करणाऱ्यांमध्ये दिग्गज वैज्ञानिक असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने