कसब्यातील गोंधळ थांबेना! रवींद्र धंगेकरांवर आणखी एक गुन्हा; कारण...

पुणे:  पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आज धंगेकरांवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.


रवींद्र धंगेकर यांनी शेअर केलेल्या फ्लेक्सवरुन थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते. याविरोधात पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर आता पोलिसात याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहगड रोड पोलिस ठाण्यात राहुल मानकर आणि अतुल नाईक यांच्या विरोधात शहर विद्रूपीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने