नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला, आणखी 'इतके' दिवस जेलवारी

 मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली.माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कोठडीमध्ये १४ दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जेलमधला मुक्काम वाढला आहे.मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक झाली आहे. आतापर्यंत अनेकदा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मलिक यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मात्र त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही.



दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख काही दिवसांपूर्वी जेलबाहेर आले होते. देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आर्थर रोड कारागृहातून देशमुख यांची २८ डिसेंबर रोजी सुटका झाली. त्यानंतर ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी देशमुख गेले होते.दुसरीकडे नवाब मलिक यांच्या अडचणी कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. मलिकांच्या कोठडीमध्ये आज कोर्टाने १४ दिवसांची वाढ केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने