लालूच्या लेकाची सायकल सुस्साट; पत्रकारांची पळून पळून पुरेवाट

बिहार: बिहार सरकारमधील लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. ते सायकल चालवत असताना त्यांच्या पाठीमागे पळून पळून पत्रकारांची पुरती वाट लागली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.तेजप्रताप यादव हे त्यांच्या सुरक्षारक्षक आणि सुरक्षेसह सायकल चालवताना दिसत आहेत. तर त्यांचे फुटेज मिळवण्यासाठी पत्रकार त्यांच्या पाठीमागे धावताना दिसत आहे. बूम आणि कॅमेरा घेतलेल्या पत्रकारांची चांगलीच फजिती झालेली आहे. तर तेजप्रताप यांनी पत्रकारांना पाहून सायकल सुसाच वेगाने पुढे नेली आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने