मंत्री नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; राऊतांच्या वकिलानं धाडली मानहानीची नोटीस

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राणे यांच्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी बदनामीचा दावा दाखल केलाय.काही दिवसांपूर्वी भांडुप इथं आयोजित कोकण महोत्सवात राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. संजय राऊत हे आपल्यामुळंच खासदार झाले आहेत, त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणेंनी केला होता.त्यामुळं बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावलीये. मंत्री नारायण राणेंना मानहानीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती राऊत यांचे वकील अॅड. सार्थक पी शेट्टी यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने