उन्हामुळे चिडचिड होते? मग ‘या’ पदार्थांचा करा आपल्या आहारात समावेश

मुंबई: आता हिवाळ्याचे दिवस संपून हळूहळू उन्हाळा सुरु झाला आहे. अर्थात उन्हाळा कोणालाच नको असतो, प्रखर ऊन, त्यामुळे येणारा घाम, चिकटपणा आणि यासगळ्यात खूप चिडचिड होते. अगदी AC किंवा कुलरमध्ये बसलो तरी उन्हाच्या झळा बसतातच, शिवाय या हवामानाचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो.वारंवार घाम येण्यामुळे किंवा सतत एसीचे तापमान सेट करतांना आपली अनेकदा चिडचिड होते. त्यामुळे अशावेळी बाहेरच्या हवेवर अवलंबून न राहता आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे आपला मूड सुधारु शकतो. ते कसं हे जाणून घ्या.मूड स्विंग कसे होतात?

खराब मूड हे तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाच्या पदार्थाची कमतरता असल्याचे लक्षण आहे. हा एक प्रकारचा न्यूरोट्रांसमीटर आहे, जो मूड स्विंग्स थांबवतो. हा घटक आपल्या शरीराचे संतुलन स्थिर राहण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असणे आवश्यक आहे. ज्या पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात असते ते खाल्ल्याने सेरोटोनिनचे उत्पादन वाढते आणि आपला मूडही चांगला राहतो. परिणामी आपण शांत आणि आनंदी राहू शकता.

मूड स्विंग टाळण्यासाठी काय खावे?

- केळी

केळामध्ये ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे केळी खाल्ल्याने मूडही चांगला राहतो आणि झोपही चांगली येते.

- बदाम

बदामामध्ये फोलेट आणि मॅग्नेशियम असतात, मॅग्नेशियम सेरोटोनिनचे उत्पादन देखील वाढवते. याशिवाय बदाम हा व्हिटॅमिन B2 आणि E चे चांगले स्त्रोत आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते.

- अननस

अननसात ट्रिप्टोफॅन असते. याशिवाय ब्रोमेलेन नावाचे प्रोटीन देखील असते.या वरील पदार्थांचे सेवन करतांना ते योग्य आणि नियंत्रित प्रमाणात करणं लक्षात ठेवायला हवं यामुळे मूड स्विंग टाळणे जास्त सोपे होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने