'तुम्हाला माता सीता समजायचो तू पातळी सोडली...' दीपिकावर नेटकऱ्यांचा संताप!

मुंबई: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले त्यामध्ये रामायण आणि महाभारत या मालिकांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आता रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया या नेटकऱ्यांच्या रडारवर आल्या आहेत. त्यांना मोठया प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे.९० च्या दशकांत रामायण आणि महाभारत या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. तो काळ टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सुवर्णकाळ होता असेही म्हटले जाते. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्यातील धार्मिक वृत्तीची देखील जोपासना केली.रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांना प्रेक्षकांचे, चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. अजुनही कित्येक चाहते त्यांना माता सीता म्हणूनच ओळखतात. मात्र आता त्या ट्रोल होत आहेत.दीपिका या सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. आपल्याकडे ज्या कलाकारांनी रामायण, महाभारत मालिकांमध्ये काम केले आहे त्यांची प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या मनातील ओळख थोडी वेगळी आहे. मनात अनेक वर्ष घर करुन असणाऱ्या त्या प्रतिमेला धक्का लागल्यास चाहते दुखावले जातात. हे दिसून आले आहे. यापूर्वी देखील कित्येक कलाकारांना त्याचा फटका बसला आहे.

दीपिका यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी देखील त्यांनी एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यावरुनही त्यांना नेटकऱ्यांना झापले होते. आताही त्यांनी बोल्ड अवतार शेयर केला आहे.यामुळे चाहत्यांचा संताप झाला आहे. त्यांनी तर आमच्या मनातील तुमची सीतेची प्रतिमा मलिन झाल्याचे म्हटले आहे. तुम्ही पातळी सोडून वागलात. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेयर करणं हा दीपिका यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे त्यांनी तो व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे शेयर केला.मात्र त्यामुळे नेटकऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आम्ही तुम्हाला ज्या रुपात पाहिले होते त्यापेक्षा तुम्ही फारच वेगळ्या आहात असेही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने