ब्रेकअपच्या अफवा ते थेट लग्न.. सिद्धार्थ - कियाराची झक्कास लव्हस्टोरी बघा

मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या पुन्हा एकदा लग्नसराई सुरू झाली आहे. ज्याची सर्वाना उत्सुकता होती असे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यात. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बी-टाउनचे लव्ह बर्ड्स मानले जातात. ते अनेकदा एकमेकांसोबत कधी पार्टी, कधी कॅफेत दिसले आहेत. त्यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे दोघे याच महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकमेकांसोबत लगीनघाई करणारी सिद्धार्थ - कियाराची जोडी प्रेमात कशी पडली.. हे पाहूया.

कियारा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी सुरु झाली 'शेरशाह' सिनेमाच्या सेटवर. शेरशाह सिनेमाच्या सेटवर सिद्धार्थ आणि कियारा यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे गेलं. दोघे रिलेशनशिप मध्ये आले अशा चर्चा सुरु झाल्या. पण सिद्धार्थ - कियारा यांनी त्यांचं रिलेशनशिप कधी जगजाहीर केलं नाही किंवा कधी नाकारल नाही. दोघांनी आळीमिळी गुपचिळी केली.शेरशाह चं शूटिंग झाल्यावर सिद्धार्थ - कियारा न्यू इयर सेलिब्रेशन साठी खास साऊथ आफ्रिकाला सुट्टीला गेले. दोघांचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. याशिवाय कियाराच्या घरी सिद्धार्थ मल्होत्रा तिच्या वाढदिवसाला गेला होता. याशिवाय सिद्धार्थच्या वाढदिवसाला कियाराने दोघांचा खास फोटो सोशल मीडियावर शेयर केलेला. इतकं सगळं असूनही दोघांच्या रोमँटिक नात्याला कोणाची दृष्ट लागली आणि अचानक दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या.बॉलिवूडचा मॅचमेकर करण जोहर या दोघांच्या मध्ये आला. करण जोहरने दोघांना एकत्र आणलं. दोघांमधले गैरसमज दूर झाले. सिद्धार्थ - कियारा एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते कि दोघे पुन्हा एकदा एकमेकांना डेट करायला लागले. बॉलिवूडच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची बातमी करणारी मीडिया या दोघांबाबत मात्र फसली. सिद्धार्थ - कियारा या दोघांनी सुद्धा त्यांच्या नात्याचा कोणालाच सुगावा लागू दिला नाही.आता मात्र सिद्धार्थ - कियारा येत्या ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार असल्याची खुप चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय. दोघांनी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला नसला तरीही दोघांच्या लग्नासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. अशाप्रकारे प्रेम - ब्रेकअप - प्रेम असा प्रेमाचा प्रवास केलेले सिद्धार्थ - कियारा खऱ्या अर्थाने लव्हबर्ड्स आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने