भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान हॉटस्टार क्रॅश; यूजर्स वैतागले

मुंबई: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान OTT आणि लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar च्या सेवा डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. खाते वापरताना यूजर्सना अडचणी येत आहेत. युजर्सनी ट्विटरवर लॉगिन न होण्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारने देखील सेवा ठप्प झाल्याचे कन्फर्म केले आहे.डिस्ने प्लस हॉटस्टार ने या आउटेजवर प्रतिक्रिया देत आमच्या अॅप्स आणि वेब सेवांना तांत्रिक समस्या येत आहेत आणि आमती टीम यावर काम करत आहे आणि लवकरच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरळीत केला जाईल असे सांगितले आहे.डाउन डिटेक्टरने देखील आउटेजच्या 500 हून अधिक घटनांची नोंद केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान हॉटस्टार डाउन झाल्याची तक्रार युजर्स ट्विटरवर करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना त्यांना मिळालेल्या एरर मेसेजचा स्क्रीनशॉट देखील ट्विटरवर शेअर केला आहे. वापरकर्ते म्हणतात की ते हॉटस्टार अॅप उघडू शकत नाहीयेत. मिळालेल्या एरर मेसेजचा स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

याच शहरांमध्ये सर्वाधिक समस्या

भारतातील प्रमुख शहरांमधील वापरकर्त्यांना हॉटस्टार वापरण्यात अडचणी येत आहेत. सर्वात जास्त समस्य दिल्ली, लखनऊ, नागपूर, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसत आहे. डाउन डिटेक्टरनुसार, लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची सेवा सुमारे तासभर बंद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने