भूकंपाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या तुर्कीच्या 10 विचित्र गोष्टी

 तुर्की: तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कित्येक घर उध्वस्त झाली. 2300 लोकांनी आत्तापर्यंत आपला जीव गमावलाय. तर शेकडो लोक जखमी झालेत. या भूकंपाची तीव्रता ७.८ स्केल इतकी होती. या भूकंपाचं केंद्र तुर्कस्तानमधल्या गाझियान्टेप शहराजवळ आहे. ना कुणाच्या मनात ना कुणाच्या ध्यानात असताना अचानक अंधार व्हावा असा हा भूकंप. ज्याने उभ्या असलेल्या बिल्डींग जमिनदोस्त झाल्या तर बोलणारी माणसं क्षणात मुकी झाली. सगळीकडे अश्रूंचा आक्रोश आणि रक्ताचा सडा... कुणाची आई गेली, कुणाचा भाऊ गेला, कुणाचे वडील गेले तर कुणाचं कुटुंबंच गेलं... आता कुणाकडं पाहावं आणि कुणाकडे राहावं हा यक्ष प्रश्न !



अशा या तुर्कीच्या काही रंजक गोष्टी देखील आहेत.

१. यातलं पहिलं म्हणजे चहा पिण्यात तुर्कीचे लोक आघाडीवर आहेत. देशातील सुमारे 96 टक्के लोक दररोज चहा पितात आणि हे प्रमाण संपूर्ण जगात सर्वाधिक आहे. इथले नागरिक दिवसाला 5 ते 10 कप चहा पितात.

२. तुर्कस्तानचे प्रसिद्ध शहर इस्तंबूल हे बायझेंटियम म्हणूनही ओळखले जाते. या शहराचे नाव बदलून कॉन्स्टँटिनोपल ठेवण्यात आले. पुढे 1930 मध्ये त्याचे नाव बदलून इस्तंबूल करण्यात आले.

३. तुर्कीचे राष्ट्रीय फूल ट्यूलिप आहे. हे नाव तुर्की भाषेतील तुलबेंड या शब्दावरून ठेवण्यात आलंय. तुलबेंडचा अर्थ अस्पष्ट किंवा मलमल असा आहे.

४. बर्‍याचदा लोकांना वाटतं तुर्कीची राजधानी इस्तंबूल आहे. पण या देशाची राजधानी अंकारा आहे. इस्तंबूल हे तुर्कीमधील सर्वात मोठं शहर आहे. इस्तंबूल आशिया आणि युरोप या दोन खंडांमध्ये येते. तसेच तुर्कस्तानचा 95 टक्के भाग आशियामध्ये आणि 5 टक्के युरोपमध्ये आहे.

५. ऑइल रेस्लिंग हा तुर्कस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे. हा खेळ मागच्या 650 वर्षांपासून तुर्कीमध्ये खेळला जातो. आपल्या कुस्तीसारखीच ही कुस्ती असते फक्त स्पर्धक यात अंगाला तेल लावून कुस्ती करतात. यासोबतच कॅमल रेस्लिंग (उंटांची कुस्ती) आणि बुल रेसलिंग (बैलांची रेसलिंग) देखील तुर्कीमध्ये खेळली जाते.

६. तुर्कीमध्ये जगातील सर्वात सुंदर मशिदी आहेत. तुर्कीमध्ये 82,000 हून अधिक मशिदी बांधण्यात आल्यात. या सर्वांपैकी, इस्तंबूलची सुल्तानामेत मशीद ही जगातील सर्वात प्रसिद्ध मशीद आहे. या मशिदीला नीली मशीद असेही म्हणतात.

७. तुर्कस्तानमध्ये लोक चहाचे शौकीन असले तरी 16 व्या शतकात तुर्कांनीच युरोपमध्ये कॉफी आणली. इथली मोचा कॉफी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर एकेकाळी इथल्या स्त्रिया आपला पती फक्त कॉफी आणू शकत नाहीत या कारणावरुन कायदेशीर घटस्फोट घ्यायच्या.

८. तुर्की भाषेतील "नझर बोनकुगु" किंवा "वाईट नजर" हा वितळलेली काच, लोखंड आणि तांब्यापासून बनलेला दगड आहे. ३००० वर्ष जुन्या परंपरेनुसार वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी तो परिधान केला जायचा. असं मानलं जातं की या निळ्या रंगाच्या दगडात नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करण्याची शक्ती आहे. तुर्कीमध्ये येणारे लोक याची सर्वाधिक खरेदी करतात.

९. तुर्की हा जगातील सर्वात मोठा हेझलनट उत्पादक देश आहे. जगातील सुमारे ७५ टक्के हेझलनट फक्त तुर्कीमध्ये उगवतात. काळ्या समुद्राच्या काठावर हेझलनटचं उत्पादन घेतलं जातं.

१०. तुर्कीमध्येही काही विचित्र मान्यता आहेत. अशाच एका मान्यतेनुसार तुर्कीचे लोक आपल्या नवजात बाळाच्या उशीखाली कासव ठेवतात. मान्यतेनुसार, कासव मुलाच्या उशीखाली ठेवल्याने त्याचं संरक्षण होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने