हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेवर ED ची धाड

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा ED ने धाड टाकली आहे. आज सकाळी ED चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. अधिकारी सकाळ पासून कागदपत्रांची पडताळणी करत आहेत.आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी देखील ११ जानेवारीला ईडीने छापेमारी केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसहा वाजता अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापुर जिल्हा बँकेवर ED ने धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ या बँकेवर अध्यक्ष आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने