शिंदे गटाची मोठी खेळी; स्व. आनंद दिघेंसोबत काम केलेले पदाधिकारी ठाण्यात

नाशिक: नाशिकधमध्ये ठाकरे गटाला भलंमोठं खिंडार पडलं आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्याजिल्ह्यातील ठाकरे गटाचे पाधिकारी-कार्यकर्ते शिंदे गटामध्ये सहभागी होत आहेत.आज नाशिक येथील ५० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांमध्ये स्व. आनंद दिघे यांच्या जुन्या सहकाऱ्यांचाही समावेश होता.


उद्धव ठाकरे गटातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करीत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरास्ते यांच्या नेतृत्त्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.आज शिंदे गटामध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी नाशिक ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये शिवाजी पालकर, रामभाऊ तांबे, राजेंद्र घुले, प्रशांत जाधव, गणेश शेलार, मंगेश दिघे, निलेश शेवाळे आदींचा समावेश आहे.यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिकमध्ये आता बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक बळ मिळेल. कारण ज्यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले होते, ते जुने कार्यकर्ते सोबत आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने