'प्रियंका तु लिडर तर शालिन हिरो...', बिग बॉसनं दाखवला सदस्यांचा घरातील प्रवास...

मुंबई: 'बिग बॉस 16' च्या यंदाच्या सिझनने सर्वांचेच मनोरंजन केले. मात्र आता शो संपायला फक्त 3 दिवस बाकी आहेत. या घराचे दिवे रविवारच्या रात्री म्हणजेच १२ फेब्रुवारीला बंद होतील, आता घरातील सदस्यांना त्यांचा आतापर्यंतचा घरातील प्रवास दाखवण्याची वेळ आली आहे नेहमी प्रमाणे प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम, शिव ठाकरे, एमसी स्टेन आणि शालीन भानोत यांना घरातील प्रवास दाखवण्यात आला आहे.

प्रियांका चहर चौधरी

बिग बॉस म्हणतो, 'प्रियांका, तू तुझ्या मित्रासोबत या घरात आलीस आणि त्याच्यासोबत असूनही तू अनेकदा एकटी पडली. डंकेच्या चोटवर तु सगळ्याना भिडली त्यासाठी खूप धाडस, खूप स्पष्टता, खूप आत्मविश्वास लागतो. विशेषत: जेव्हा तुमच्या पाठीशी कोणीही उभं नसतं तेव्हा ते अधिक कठीण होतं, पण ती गोष्ट आहे प्रियंका चहर चौधरीची. प्रियांका या घरातील सर्वात हुशार मुलगी आहे, ती फॉलोअर नाही तर लीडर आहे.'शालीन भानोत:

बिग बॉस म्हणाली, 'घरातील सदस्य तूला नकली आणि खोटे बोलवून तुमच्याशी असलेलं नाते तोडत असताना, तूझे प्रेक्षकांशी असलेले नाते अधिक घट्ट होत गेले. शालीन तूझ्यावर नेहमीच घरात अॅक्टिंग करत असल्याचा आरोप करण्यात आला. पण त्यात गैर काहीच नाही. तु जर अभिनय करून इथपर्यंतचा प्रवास केला असेल तर तुझ्यात काहीतरी नक्कीच असेल. अॅक्शन ड्रामा, रोमान्स भेटूनच सुपरफिट चित्रपट बनतो. या गोष्टी ऐकून शालीनने आनंदाने उड्या मारतो.

शिव ठाकरेला बिग बॉस म्हणतो, मराठी बिग बॉस २चा विनर शिव हा मंडलीचा जीव आहे. तर एमसी स्टॅनच्या रॅपचं कौतुक करत म्हणाले की, फक्त पी टाउनचं नाही तर सगळा भारतचं यात तूझं घर जाईल असं म्हणत आहेत. त्याचे पूर्ण नाव घेत बिग बॉस म्हणतात, 'अल्ताफ गडवी उर्फ ​​एमसी स्टेन. आज संपूर्ण भारत एमसी स्टॅनच्या 'शेमडी'च्या प्रेमात पडला. बाकिच्या सदस्यांचा प्रवासही दाखवणं बाकी आहे. फॅन्ससोबत हा प्रवास पाहतांना घरातील सदस्य खूप भावूक झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने