'मंडली' धोक्यात! घरात पार पडलं शॉकिंग नॉमिनेशन.. कुणाचा पत्ता होणार कट?

मुंबई:  टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 16 चा फिनाले जवळ आला आहे. दिवसेंदिवस हा शो अजून आक्रमक होत चालला आहे. घरामध्ये एकीकडे मंडळी दुसरीकडे प्रियंका आणि अर्चना असं चित्र पहायला मिळतं असतांनाच आता मंडली मध्येही फुट पडल्याचं चित्र दिसत आहे. बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेसाठी आता फक्त 11 दिवस उरले आहेत.बिग बॉस 16 च्या घरात सध्या फक्त 6 सदस्य आहेत. अशा परिस्थितीत घरात रोजच घरात वेगळं काहीतरी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आता नुकतचं घरात नॉमिनेशनचं टास्क पुर्ण झालं. बिग बॉसने सर्व हाउसमेट्सना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि सांगितले की दोन्ही संघांमध्ये नॉमिनेशनसाठी स्पर्धा होईल. एकीकडे संघात मंडलीचे सदस्य असतील तर दुसऱ्या बाजूला इतर सदस्य असतील.


बिग बॉस निमृतला नॉमिनेशन पासून सुरक्षित आहे कारण ती घराची कॅप्टन आहे. यानंतर, बिग बॉस सर्व स्पर्धकांना टास्कचे नियम समजावून सांगतात. टिम मधल्या सदस्यांना अंदाज लावण्यासाठी 9 मिनिटं आहेत. जो संघ एकूण 27 मिनिटांचा अंदाज लावण्याच्या सर्वात जवळ असेल ती विजेता होईल आणि पराभूत संघाच्या सदस्यांना घरातून बाहेर काढले जाईल. आणि यासोबतच नॉमिनेशमन टास्कही संपेल. नामांकन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अर्चना या गेमची सुरवात करते. घरातील सर्व सदस्य आलटून पालटून या कामात सहभागी होतात.टास्क संपतो आणि बिग बॉस पुन्हा एकदा लिव्हिंग एरियातील सर्वांना एकत्र करतो. बिग बॉसने नॉमिनेशन प्रक्रिया संपल्याची माहिती दिल्यानंतर.टास्क जिंकलेल्या टीममध्ये शालीन, प्रियांका आणि अर्चना आहेत. तर सुंबुल, स्टेन आणि शिव ची टिम पराभव होतो. नॉमिनेशन टास्क जिंकल्यानंतर अर्चना, प्रियांका आणि शालीन 'बिग बॉस 16' च्या शेवटच्या आठवड्यात पोहोचले. तर शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि सुंबुल यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने