'चुप माही चुप है रांझा, बोल कैसे वे ना जा!' शेरशाहच्या लग्नातला तो खास क्षण

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे लव्ह बर्डस आता कायमचे एक झाले आहेत. त्यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड-कियारा जवळच्या नातेवाईकांच्य उपस्थित विवाह बंधनात अडकले. यानंतर दोघांनीही लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांना दोघांना पाहून चाहते खुप खुश झाले.आता आज सिड आणि कियाराने लग्नाची आणखी एक झलक चाहत्यांनसोबत शेअर केली आहे.त्यानी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो एखाद्या परीकथेपेक्षा कमी दिसत नाहीये. यात नववधू असलेल्या कियाराची एन्ट्री तिचा स्टेजवरचा भन्नाट डान्स, सिद्धार्थची तिनं केलेली छेडछाड, त्याला मारलेली मिठी, वरमाला समारंभ आणि मग शेवटचा लिप किस... सगळं काही मनाला भावणारा आहे.त्यानी शेअर केलेल्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात राजेशाही थाटात नववधू कियाराची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. ती स्टेजवर येते आणि डान्सही करते. ती सिडला पाहचताच त्याला  मिठी मारते. यानंतर त्यांचा वरमाला समारंभ होतो, ज्यामध्ये सिद्धार्थही तिला त्रास देतांना दिसतो.यानंतर सिद्धार्थने कियाराच्या गळ्यात मालाही घालताच गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंनी उधळण होते. दोघेही एकमेकांना किस करतात आणि नंतर पाहुण्यांकडे पाहून आनंद व्यक्त करतात. शेवटी दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हात जोडून बसलेले दिसतात आणि या सगळ्यात त्याच्या 'शेरशाह' चित्रपटातील 'रांझा' हे गाणेही या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वाजतांना दिसतेय.त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी खुप प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच त्याचा हेवा वाटेल असं शाही लग्न त्यांनी केल्याचं दिसतयं. हा व्हिडिओ म्हणजे चाहत्यांसाठी एखादी ट्रिट आहे आणि चाहत्यांना हा व्हिडिओ खुप आवडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने