तूच खरा सुपरस्टार..! फॅनच्या उपचाराचा खर्च अल्लू अर्जुनने उचलला.. केली इतक्या लाखांची मदत

मुंबई:  एखादा अभिनेता यशस्वी होतो तेव्हा त्याच्या मागे त्याच्या असंख्य फॅन्सचं प्रेम असतं. सुपरस्टार पदावर पोहोचलेला या कलाकाराला त्याच्या फॅनच्या प्रेमाची कायम जाणीव असावी लागते. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आयुष्यात त्याच्या फॅनचा असाच एक किस्सा घडला. हा किस्सा ऐकून तूच खरा सुपरस्टार असं सर्वजण पुष्पा फेम अल्लू अर्जुनला म्हणत आहेत.ट्विटरवर ट्रेंड्स अल्लू अर्जुन नावाचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये अल्लू अर्जुनचा फॅन अर्जुन कुमारच्या बाबांना तातडीने मेडिकल ट्रीटमेंटची गरज होती. या मेडिकल ट्रीटमेंट साठी त्यांना २ लाख रुपयांची गरज होती. त्यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. शेवटी हि बातमी अल्लू अर्जुन पर्यंत पोहोचली. आणि अल्लू अर्जुनने तत्काळ मदत पोहचवली.'पुष्पा' या दाक्षिणात्य चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले. 'पुष्पा'स्टार अल्लु अर्जुनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते.अगदी अल्लू अर्जुनच्या नावाने सोशल मीडिया अकाउंटवर विविध फॅन पेजेस निर्माण झाले आहेत. अल्लू अर्जुन जरी सुपरस्टार असला तरी आपल्या सर्व फॅनची तो व्यस्त दिनक्रमातून दखल घेत असतो

काहीच दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या फॅनचा एक भन्नाट किस्सा घडला. मुंबईतील प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी, अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता असून त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेये सादर केली आहेत.अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि फ्रेम्स असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून हा ज्यूस पिण्यासाठी फॅन्सची गर्दी झालीय. अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध पुष्पा सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच पुष्पा २ याचवर्षी म्हणजेच २०२३ ला डिसेंबर महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने