अर्चनाच्या हातातून बिग बॉसची ट्रॉफी जाणार? काय आहे कारण?

मुंबई: बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये अर्चना गौतमनं कमाल केलेली दिसून येते. तिच्या आक्रमकतेचा अनभुव अनेक स्पर्धकांनी घेतला आहे. अर्चना पहिल्यापासून बिग बॉसमध्ये चर्चेत आहे. आता शेवटच्या टप्प्यात असे काही घडले की त्यामुळे अर्चनाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ज्या अर्चनानं यंदाचा बिग बॉसचा शो हादरवून सोडला तिच्याबाबत असं काय घडलं की त्यामुळे मागे पडताना दिसते आहे, असा प्रश्न समोर आला आहे.अर्चना गौतम ही एंटरटेनमेंट क्वीन आहे असे म्हटले जाते. गेल्या सीझनमध्ये राखी सावंतनं बिग बॉसला वेगळ्याच उंचीवर नेले होते. बिग बॉसचा टीआरपी कमी झाल्यानंतर राखीनं बिग बॉसची धुरा आपल्या खांद्यावर त्या शो ला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. अनेकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. पण ऐकेल ती राखी कसली तिनं कुणाचेही न ऐकता आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली होती.यंदाच्या सीझनमध्ये प्रती राखी म्हणून अर्चनाकडे पाहिले गेले आहे. कित्येकांनी तिला संभाव्य विजेता म्हणून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. अर्चनानं भलेही अनेकांना हसवले असेल, कित्येकांचे मनोरंजन केले असेल मात्र तिची निगेटिव्ह साईड देखील समोर आली आहे. त्यामुळे तिच्यावर टीका होताना दिसते आहे. एखाद वेळी तर तिनं बिग बॉसलाच धारेवर धरल्याचे दिसून आले होते. अर्चनाचा उद्दामपणा हा सोबतच्या सहकाऱ्यांना असहनीय झाला होता.अर्चनाचं बोलणं, तिचं भाडणं अनेकांसाठी तक्रारीचं कारण होतं. त्यामुळे तिच्या सततच्या वादाला बिग बॉसही वैतागले होते. त्यांनी तिला समजही दिली होती.

 पण अर्चना कुणाचं ऐकणारी नव्हती. शेवटी तिनं अनेकांशी पंगा घेऊन बिग बॉसमधील आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिच्या चाहत्यांना काय वाटते ते अधिक महत्वाचे आहे.सोशल मीडियावर अर्चनाच्या नावानं नेटकरी वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहे. याचा कारण तिचा संताप. स्पर्धकांशी उद्धटपणानं बोलणं हे अनेकांना खटकताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्याविरोधातच वातावरण तयार होत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे अर्चनाचे काय होणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे ट्रॉफी जिंकण्यापासून ती अधिक लांब जाताना दिसते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने