धोनी बनला 'रॉयल शेतकरी'; शेतात ट्रॅक्टरने करतोय नांगरणी

मुंबई: क्रिकेटच्या विश्वात आपल्या खेळीने आणि नेतृत्वाने भारताना उच्च स्थानावर नेऊन ठेवणारा महेंद्रसिंह धोनी सध्या आपलं आयुष्य आरामात घालवत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो शेतात ट्रॅक्टरवर बसून नांगरताना दिसत आहे. यापूर्वी तो दुबईत गेला होता.सध्या धोनीचा शेतातील व्हिडिओ व्हायरल होत असून तो यामध्ये स्वराज 963 या ट्रॅक्टरवर बसून नांगरणी करत आहे. तर त्याच्याबरोबर एक व्यक्ती बसलेला आपल्याला दिसत आहे. त्याने बऱ्याच मोठ्या शेताची नांगरणी केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. त्याने झारखंड येथील रांची येथे शेती सुरू केल्याची चर्चा होत आहे. तर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान, धोनी याने काही वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतली असून उरलेला वेळ तो आपल्या कुटुंबासोबत आणि नवनवीन कामे करण्यासाठी वापरत आहे. काही दिवसांपूर्वी तो आपली मुलगी आणि बायकोसोबत दुबईला गेला होता. त्यावेळी तेथील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने