Sanjay Leela Bhansali च्या 'हीरामंडी' चा फर्स्ट लूक समोर.. 52 वर्षाच्या मनिषापुढं सोनाक्षीही दिसली फिकी..

मुंबई: गंगूबाई काठियावाडी'नंतर बॉलीवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर संजय लीला भन्साली वेब सीरिज जगतात एन्ट्री करत आहेत. संजय लीला भन्साली दिग्दर्शित 'हीरामंडी' ही वेब सीरिज या निमित्तानं लवकरच आपल्या भेटीस येत आहे.याचा फर्स्ट लूक समोर आला असून त्यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मनीषा कोईराला,सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी,रिचा चड्ढा,संजीदा शेख,शर्मिन सेगल या सगळ्यांचा रॉयल लूक समोर आला आहे.या लूकनं सगळ्यांनाच क्रेझी करून सोडलं आहे आणि सोशल मीडियावर फक्त आता 'हीरामंडी' ची चर्चा सुरु झाली आहे.या व्हिडीओत सुरुवातीस संजय लीला भन्साळी यांचे नाव दिसत आहे. ज्यानंतर मनीषा कोईराला,आदिती राव हैदरी,शर्मिन सेगल,रिचा चड्ढा आणि अखेरीस सोनाक्षी सिन्हाची झलक पहायला मिळते. सगळ्याजणी पिवळ्या रंगाच्या आऊटफीटमध्ये नजरेस पडत आहेत. हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचं देखील व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.हीरामंडीच्या फर्स्ट लूक व्हिडीओत त्या जमान्याची झलक दाखवण्यात आली आहे,जेव्हा वेश्या राण्यांसारखं आयुष्य जगायच्या. या व्हिडीओला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'' संजय लीला भन्साली यांनी बनवलीय आणखी एका युगाची,हरवलेल्या श्रीमंत काळाची आणि जादुई दुनियेची कहाणी..ज्याची आपण सगळेच वाट पाहत आहात. ही हीरामंडीच्या एका सुंदर जगाची एक झलक आहे. लवकरच भेटीस येत आहे''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने