पूर्वपुण्याई दुसरं काय! राहुलला पुढच्या सामन्यात खेळण्याबाबत कोचने केला मोठा खुलासा

मुंबई:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपूरात खेळल्या जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 400 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. त्याचवेळी टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलला धोका तयार झाला आहे. पहिल्या कसोटीत तो फ्लॉप राहिला आहे. त्याच्या सततच्या फ्लॉप कामगिरीनंतर टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनी त्याच्या स्पॉटबाबत इशारा दिला आहे.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांनी पत्रकार परिषदेत बॅटिंग कोच विक्रम राठोरला विचारले की, केएल राहुलची जागा धोक्यात आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना विक्रम म्हणाला, राहुलबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 10 डावांमध्ये त्याने काही शतके तर काही अर्धशतके केली आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याच्या शक्यतेवर चर्चा करावी असे मला वाटत नाही..प्रशिक्षकाच्या शब्दांव्यतिरिक्त केएल राहुलने गेल्या 10 डावांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याने केवळ एकच पन्नास केले आहे. राहुलने गेल्या 10 डावांमध्ये 23, 50, 8, 12, 10, 22, 23, 10, 2 आणि 20 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 18 झाली आहे. बांगलादेशविरुद्धही तो चार डावांत सलामीला उतरला पण त्याला २५ धावांचा आकडाही पार करता आला नाही.बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काल सांगितले की सध्याच्या संघ व्यवस्थापनात उपकर्णधाराला सुरक्षा कवच वगैरे गोष्टी नाहीत. तो म्हणाला, 'कोण म्हणालं उपकर्णधाराला सगळं माफ असतं? उपकर्णधाराला डच्चू मिळू शकत नाही असा का नियम आहे का?. केएल राहुलकडे कसोटी क्रिकेटमध्ये भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. मात्र चांगल्या फॉर्ममध्ये असलेले अनेक खेळाडू हे बेंचवर बसून आहेत. कोणालाही विशेष सवलत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने