कोलकाता : क्रीडा विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारताचे माजी फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं गुरुवारी वयाच्या 87 व्या वर्षी दीर्घकालीन आजारानं निधन झालं.अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन बंगाल फुटबॉल संघटना आणि शासनातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलीये. 1962 साली आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघामध्ये तुलसीदास बलराम यांचा समावेश होता.
तसंच बलराम यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 1950 आणि 1960 या दोन दशकामध्ये भारतीय फुटबॉल क्षेत्रातील तत्कालिन अव्वल फुटबॉलपटू चुनी गोस्वामी, पी. के. बॅनर्जी यांच्यासमवेत तुलसीदास बलराम यांचं नावही गाजलं होतं. 1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यांच्या निधनामुळं दु:ख व्यक्त केलं जात आहे.