थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोले स्पष्टच बोलले, वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...

मुंबई: काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर ज्यांच्यावर नाराज होऊन राजीनामा दिला ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलताना म्हणाले की, आज बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सुरवातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाना पटोले यांनी दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. तर बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर पटोले म्हणाले की, बाळसाहेबांचा राजीनामा आमच्याकडे आला नाही. त्याचबरोबर त्यांनी लिहलेली पत्रेही आमच्यापर्यंत आलेले नाहीत.

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की आमचा बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. ते यांच्याशी बोलतच नाही. आम्ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तयारीत आहोत. त्यामुळे आमचा काहीही संपर्क आहे. या संबधी फक्त बातम्या आहेत. भाजपला काँग्रेस संपवायचा आहे. त्यामुळे या अफवा सुरू आहेत. बाकीचे प्रश्न सोडून काँग्रेसकडे लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही नाना पटोले म्हणाले आहेत.तर ते म्हणाले की, हायकमांड याकडे लक्ष्य देत आहेत. त्यामुळे मी याकडे लक्ष देत नाही. पक्षाने दिलेलं काम मी करत आहे. बाकी काही मला माहिती नाही. बाकी कोणत्या गोष्टीवर मी बोललं नाही. तर बाळासाहेब यांच्या राजीनाम्यावर आणि पत्रावर त्यांनी ठामपणे उत्तर देत आमच्यापर्यंत यातली कोणतीही गोष्ट आलेली नाही असं ठामपणे नाना पटोले यांनी सांगितलं आहे.तर पुढे ते म्हणाले की, मी नवे राजकारण शिकत आहे. मला बाकी काही माहीत नाही. कोण काय राजकारण मार्ट आहे त्यात मला पडायच नाही. ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या गोष्टींवर मी बोलणार नाही असंही नाना पटोले म्हणालेत.केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, राजीनाम्याच्या पत्रात थोरातांनी आपण काँग्रेसच्याच विचारांनी पुढे जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात केलं आहे.विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील कलह टोकाला गेल्याचं सर्वांसमोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने