आतापर्यंत कोणाला जमलं नाही ते कर... गावसकरांना पुजाराला दिले चॅलेंज

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू होण्यापूर्वी आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा गौरव करण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी सुनिल गावसकर यांच्या हस्ते पुजाराला 100 व्या कसोटीसाठी कॅप देण्यात आली.चेतेश्वर पुजारा म्हणाला की, 'सुनिल गावसकर यांच्याकडून ही मानाची कॅप घेणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. सुनिल गावसकर हे माझे प्रेरणास्थान आहेत. मी युवा असताना मला भारताकडून खेळायचे होते. मात्र मी 100 कसोटी सामने खेळेन असे कधी वाटले नव्हते.'आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या पुजारासाठी टीम इंडियाने देखील खास सेलिब्रेशन केले. यावेळी टीम इंडियाने चेतेश्वर पुजारासाठी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.दरम्यान, यावेळी सुनिल गावसकर यांनी देखील चेतेश्वर पुजाराचे 100 कसोटी खेळणाऱ्यांच्या क्लबमध्ये स्वागत केले. याचबरोबर सुनिल गावसकर पुजारासाठी कौतुकाचे चार शब्दही बोलले. त्यांनी पुजाराला भारताकडून 100 व्या कसोटी सामन्यात मोठी शतकी खेळी करून भारताचा 100 व्या कसोटीत शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपूट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने