"पुढच्या दोन वर्षांत Google संपेल"; Gmail च्या निर्मात्याची भविष्यवाणी

अमेरिका: कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानावर आधारित ChatGPT मुळे गुगल व्यवस्थापनात बरीच खळबळ उडाली आहे. गुगलला त्याच्या व्यवसायाला ChatGPT कडून धोका आहे असं वाटत आहे. त्यामुळे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वत: अनेक बैठका घेतल्या होत्या. आता Gmail चे निर्माते पॉल बुचेट यांच्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा आहे.ChatGPT हे टूल पुढील दोन वर्षांत सर्च इंजिन कंपनी गुगलला संपवू शकते, असं वक्तव्य पॉल यांनी केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत, ChatGPT चा दहा लाखांहून अधिक लोकांनी वापर केला आहे. 



हे टूल गुगलपेक्षा खूप शक्तिशाली आहे. कारण, गुगलचे सर्च रिझल्ट हे लिंक्सवर आधारित असतात. पण, ChatGPT अवघड विषयही अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगते. त्याची भाषा अजिबात यांत्रिक वाटत नाही.Gmail चे निर्माते पॉल बुचेट यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, Google एक किंवा दोन वर्षांत पूर्णपणे संपुष्टात येईल. या नव्या सर्च इंजिनमुळे सर्च ऑप्शन्सचं पेज काढून टाकलं जाईल. या ठिकाणी कंपनीला सर्वाधिक पैसे मिळतात. जरी कंपनीने AI वर प्रभुत्व मिळवले, तरीही कंपनी तिच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा भाग नष्ट केल्याशिवाय ते पूर्णपणे वापरात आणू शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने