…तर शरद पवार समशुद्दीन अन् अजित पवार अजदुद्दीन झाले असते… भाजप नेत्याची टीका

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र हा जितुद्दीन असता, अजित हे अजदुद्दीन तर शरद पवार हे शमशुद्दीन असते, अशी घणाघाती टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे. त्याचबरोबर त्यांची जीभ कापणाऱ्यास मोठं बक्षीस दिलं जाईल असंही म्हंटलं आहे.तर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. पण आव्हाड यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी गरळ ओकू नये. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर जितेंद्र हा जितुद्दीन , अजित हे अजदुद्दीन, शरद पवार हे शमशुद्दीन झाले असते. त्याला सांगायला नव्या कुणाची गरज नाही असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

तर आव्हाड यांच्या या व्यक्तव्यावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक चिथावणीखोर विधान केलं आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे.दरम्यान, केलेल्या व्यक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली बाजू मांडली आहे. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण, अर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिलशाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं आव्हाड म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने